रोगराई घेऊन आलेलं हे वर्ष सर्वांसाठीच वेदनादायी ठरलं आहे. रोगराईमुळे संपूर्ण देशाची व देशातील जनतेची वाताहत झाली आहे. रोगराईच्या या काळात अनेक संकटं निर्माण झाल्याने संकटाचा सामना करतांना कित्येकांचे तोल गेले आहेत. रोगराईच्या प्रकोपामुळे देशात टाळेबंदी करण्यात आल्याने रोजगाराची वानवा होऊन नागरिकांमध्ये आर्थिक दुर्बलता निर्माण झाली. मानवी रोगराई बरोबरच शेतमालांवरही रोगराई आल्याने शेतकरीही आर्थिक संकटात आला. रोगराईमुळे निर्माण झालेल्या संकटात प्रत्येकच जण होरपळून निघाल्याने मानसिक खचीकरण होऊन कित्येकांनी टोकाचे निर्णय घेतले आहेत. जबाबदारी व आव्हाने न पेलल्या गेल्याने नैराशेच्या गर्तेत आलेल्या तसेच परिस्थितीचा सामना करण्यात अपयशी ठरलेल्या नागरिकांनी जीवनातून एक्झिट घेतल्याने तालुक्यात आत्महत्यांचे सत्रच सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुणी आर्थिक विवंचनेतून तर कुणी कौटोम्बिक चिंतेतून, कुणी आज
0
Reposts: 0